मनमोहक रात्री 🌃


 

काय  जादू आहे या रात्रींच्या सनाट्यात ? 
का हि रात्रीची शांतात आधी असहनीय त्रास देऊन मग असीम शांतता देते .
खिडकीच्या बाहेरची ती दुनिया जणू काही हात पसरून बोलवत आहे असे का वाटू लागते...
का ?  मला या गुदमरलेल्या आणि दाटीवाटीने बांधलेल्या बिल्डींग्स दिवसा भयाण व रात्री याच बिल्डिंग मधे एक वेगळच सौंदर्य दिसून येत. 
एखादा चित्रपटा पहावा तसा या रात्रीच्या नजार्यास डोळे टिपून बगावंस वाटत. 
मोर जसा पावसात स्वतःला विसरून आनंदात विहंग बनतो, तसच माझं हे बावर मन त्या विहंगाप्रमाणे उंच भरारी घेऊ लागत.  
नकळत या बिल्डिंग माझं मन ओढून का टाकतात कोणत्याही परिस्थिती मला स्थिर होईला शिकवतात. 
काय जादू आहे या माती आणि विटांनी बनवलेल्या या इमारतीत एक वेगळीच प्रकारची शांतात मानस देऊन जातात. 
दाटीवाटीच्या या इमारतीत एक क्वचित लावलेलं ख्रिसमसच झाड मला बर्फाळप्रदेशाप्रमाणे भासत.  
ही त्वचेला कुर्वाळणारी हवा, जणू कानात काही अबोल गीत गात आहे असे वाटते  . 
दिवसा अतिशय त्रास देणारे ध्वनी आता लुप्त वाटतात आणि त्या शांततेत सुद्धा एक प्रकारचा संतोष हृदयाला मिळतो. 
का हि रात्र मला अशी मनमोहक वाटणाऱ्या गीता प्रमाणे पुन्हा पुन्हा ऐकू वाटते जगू वाटते . 




My Instagram

Copyright © villcitygirl. Made with by OddThemes